पनवेल : रामप्रहर वृत्त
जागृती फाउंडेशन व तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल युवा जिल्हास्तरीय तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत आदींनी भेट दिली. या सर्वांनी आयोजकांचे व स्पर्धकांचे कौतुक केले. जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे, तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर अध्यक्ष प्रज्ञा भगत, सचिव संजय भोईर खजिनदार हेमंत कोळी सहसचिव संदीप भगत यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. विविध वजनी गटात आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात जागृती फाऊंडेशन करत असलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून निलेश सोनवणे यांचे काम असेच चालू राहू देत अशा शुभेच्छा दिल्या.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper