Tuesday , February 7 2023

महिला व बालकल्याण समितीतर्फे विधवा महिलांना अर्थसहाय्य करावे

सभापती मोनिका महानवर यांचे आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे पालिका हद्दीतील विधवा महिलांना अर्थसहाय्य करण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सभापती मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन केली आहे.

महानवर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेतील सन 2020-21 या वर्षी ज्या महिलांचे पती आकस्मात मृत्यू किंवा कोरोना काळात मृत्यू झालेले आहेत. त्या महिलांचे उदरनिर्वाहाचे साधन एकाएकी नष्ट होऊन त्याच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यांचे बेकारीचे प्रमाण वाढलेले असल्याने त्यांना महानगरपालिकेकडून मानधन उपलब्ध करून देण्याबाबत याआधीही पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मागील पत्र व आताच्या पत्राचा संदर्भ घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

लघु उद्योगाचे साहित्य वाटप करण्याची मागणी

विधवा महिलांना त्याच्या उदरनिर्वाहासाठी व त्यांच्यापुढील वाटचालीसाठी किंवा त्यांना योग्य तो व्यवसाय करण्यासाठी त्या महिलांना मानधन अथवा त्यांना उद्योगधंद्याकरिता लागणार्‍या विविध वस्तुचे वाटप करण्यात यावे. यात पिठगिरण मशीन, पापड करण्याचे मशीन, शिवण यंत्र, मसाला डंक अथवा मशीन इत्यादी वस्तू पनवेल महानगरपालिका हद्दीतील विधुर महिलांकरिता महिला व बालकल्याण समिती मार्फत विविध वस्तूचे वाटप करण्यात यावे, अशी मागणीही महानवर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply