पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील यांचे गुरुवारी (दि. 5) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. लक्ष्मणशेठ पाटील यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी 10.30 वाजता पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र अविनाश, शैलेश व सचिन पाटील, मुलगी राजश्री दीपक म्हात्रे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …