Breaking News

कोशिश फाऊंडेशनच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषेत आणि तीन गटांत ही स्पर्धा झाली होती.  
स्पर्धेत गट ’अ’साठी (इयत्ता पहिली ते चौथी) मी वर्गाचा मॉनिटर झालो तर, शाळा कधी चालू होणार?, मी मुख्याध्यापक झालो तर, माझा आवडता विषय, गट ’ब’ साठी (इयत्ता पाचवी ते सातवी) मी पंतप्रधान झालो तर, मी देव झालो तर, घराचे प्रतिनिधित्व कुणाकडे? आई की बाबा?, माझा आवडता विषय, तर गट ’क’साठी (इयत्ता आठवी ते दहावी) नेतृत्व वारसा हक्काने की कर्तृत्वाने, माझा आदर्श नेता, पनवेल नगरीच्या विकासात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे योगदान, माझा आवडता विषय हे विषय होते.  
या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेल महापालिकेचे सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी स्पर्धकांचे आभार मानले आहेत.
गटनिहाय निकाल
इयत्ता पहिली ते चौथी गट (मुली, मराठी भाषा) ः प्रथम गार्गी महेश म्हात्रे, द्वितीय आरोही अविनाश भोपळे, तृतीय मिहिका मनिष डांगे आणि परी वैभव शेट्ये; इयत्ता पहिली ते चौथी गट (मुले, मराठी भाषा) ः प्रथम अवनिश अमेया कस्तुरे, द्वितीय विभास संजय शिंदे, तृतीय मयुरेश संतोष माने; इयत्ता पहिली ते चौथी गट (मुली, इंग्रजी भाषा) ः प्रथम कौशिकी बॅनर्जी, द्वितीय अमृता भरत ढोले, तृतीय स्वस्तिका पत्रा; इयत्ता पहिली ते चौथी गट (मुले, इंग्रजी भाषा) ः प्रथम श्रीनाथ प्रसाद, द्वितीय उज्वल लहू चौगुले, तृतीय रिषीत गुप्ता आणि आरुष पंकज डेरे;  
इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुली, मराठी भाषा) ः प्रथम स्वरा देशमुख, द्वितीय अक्षया वर्तक, तृतीय निर्भया अभय सहस्त्रबुद्धे; इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुले, मराठी भाषा) ः प्रथम ऋषिकेश धोंडीराम तांदळे,  द्वितीय हर्षद किसन सत्रे, तृतीय शौर्य शेखर रेवडकर; इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुली, इंग्रजी भाषा) ः प्रथम समृद्धी श्रीकांत मोरे आणि कनिष्का हनुमंत मोरे, द्वितीय सिमरन अयंगार, तृतीय क्रमांक गार्वी तिडके; इयत्ता पाचवी ते सातवी गट (मुले, इंग्रजी भाषा) ः प्रथम रिषीत जैन, द्वितीय अर्थ मोहन, तृतीय संचित जाधव; इयत्ता आठवी ते दहावी गट (मुली, मराठी भाषा) ः प्रथम सई मयुरेश जोशी, द्वितीय वैदेही विकास वारे, तृतीय श्रीशा पराग पुलीवर; इयत्ता आठवी ते दहावी गट (मुले, मराठी भाषा) ः प्रथम रोहित शीतलकुमार कांबळे, द्वितीय अनिरुद्ध सुरेश पाटील, तृतीय जय सतीश रुपवते; इयत्ता आठवी ते दहावी गट (मुली, इंग्रजी भाषा) ः प्रथम अपूर्वा पुरी गोस्वामी, द्वितीय सुहानी रावत, तृतीय आस्था रंजन; इयत्ता आठवी ते दहावी गट (मुले, इंग्रजी भाषा) ः प्रथम देवांश पाटील आणि मोहंमद सिद्धीकी, द्वितीय अनिरुद्ध सुरेश पाटील मोहंमद फरश, तृतीय वेदांत कांबळे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply