मुंबई ः राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांनुसार सर्व मॉल्स आता रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. याकरिता दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक असणार आहे, मात्र 18 वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू नसल्याने त्यांना मॉलमध्ये जाण्याबाबत संभ्रम कायम होता. हा गोंधळ अखेर दूर करण्यात आला आहे. राज्यात 18 वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे, पण त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक असणार आहे. ब्रेक दी चेनच्या सुधारित आदेशात हा निर्णय घेण्यात आला आहे.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …