Breaking News

भाजपतर्फे माथेरानमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर

माथेरान : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या माथेरान मंडळाने नुकताच   हॉटेल रंगोली येथे मोफत नेत्र तपासणी आणि आधार कार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित केले होते. त्याचा लाभ सुमारे पाचशे नागरिकांनी घेतला. रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवामोर्चाचे किरण ठाकरे, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम, चंद्रकांत जाधव, नगरसेविका प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, सोनम दाभेकर, प्रियंका कदम, ज्योती सोनावळे, रूपाली आखाडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपचे माथेरान मंडळ अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष शैलेंद्र दळवी,  सुभाष भोसले, सचिव संपत दरेकर, संजय भोसले. महिला मोर्चा अध्यक्षा संध्या शेलार, युवा मोर्चा अध्यक्ष बाबू बर्गे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply