Breaking News

फेटेवाल्या गणेशमूर्तींना यंदा मोठी मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी
गणेशोत्सव आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. हळूहळू गणेशभक्त आपल्या गावी येऊ लागल्याने गावे गजबजू लागली आहेत. आपल्या घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी गणपतीची मूर्ती ठरविण्यात आली असून यंदा फेटेवाल्या गणेशमूर्तींना भाविकांची मागणी जास्त दिसून येत आहे. या वर्षीदेखील पेणमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूमातीच्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. यात फेटेवाल्या गणेशमूर्ती लक्षवेधी ठरत आहेत. हिरेजडीत नक्षीकाम केलेल्या गणेशमूर्तींनाही यंदा चांगली मागणी आहे. आकर्षक रंगसंगती आणि सुबक मूर्ती हे पेणच्या कारागिरीचे वैशिष्ट्य असून जवळपास 250 प्रकारच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. एलईडी लाईटवाले गणपतीही चर्चेत आहेत. मूर्तीला आकर्षक आणि रंगीबेरंगी एलईडी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाच प्रकारच्या एलईडी लाईटवाल्या गणेशमूर्ती आणि गौरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मूर्ती अडीच ते तीन हजारांना विकल्या जात आहेत. याशिवाय बालगणेश रूपातील बाप्पा, सिद्धिविनायक गणपती लालबागचा राजा, देवतांच्या रूपातील गणेशमूर्ती आणि मोती व अमेरिकन डायमंड यांनी सजावट केलेल्या मूर्तींना सध्या जास्त मागणी असल्याचे पेणमधील गणेश कारखान्याचे मालक दीपक समेळ यांनी सांगितले.

Check Also

पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात सिडकोने तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या …

Leave a Reply