Breaking News

पिंगळसई गावातील देशमुख परिवाराचा एक कुटुंब एक गणपती

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्यातील पिंगळसई गावातील देशमुख तरुण मंडळाने एक गाव एक गणपती हा शिरस्ता 12 पिढ्या म्हणजेच 350 वर्षापासून अधिक काळ पारंपरिक पद्धतीने जोपसला आहे.

रोहे शहरापासून दीड ते दोन किमी अंतरावर पिंगळसई हे गाव आहे. या गावात मोठ्या संख्येने देशमुख कुटुंब आहेत. त्यातील काही सदस्य नोकरी व्यवसायासाठी परगावीही स्थायिक झाले आहेत, मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशमुख कुटुबांतील सर्व सदस्य एकत्र येतात आणि मोठ्या भक्तिभावाने व गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी येणारा खर्च देशमुख तरुण मंडळातील कुटुंब वर्गणी काढून करीत असतात.

या मंडळाच्या गणेश मिरवणुकीला रोहा शहरातून सुरुवात होते. देशमुख कुटुंबांतील प्रमुख ज्येष्ठ मंडळी,  तरुण मंडळाचे कार्यकर्ते व लहान मुले मिरवणूक काढीत गणरायाला वाजतगाजत आपल्या पिंगळसई गावात आणतात. विधिवत पूजा करून आनंदमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. आरतीसह अन्य आध्यात्मिक कार्यक्रमास देशमुख परिवारातील सर्व आबालवृद्ध, तसेच महिला सदस्य उपस्थित राहतात.   भजन, कीर्तन, महिलांचे हळदीकुंकू, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. गेल्या वर्षाप्रमाणेच या ही वर्षी देशमुख तरुण मंडळ कोरोनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशमुख परिवारांतील सदस्य जातीने लक्ष देऊन परिश्रम घेत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply