उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील गोपाळवठ धनगरवाडी, कारवीने धनगरवाडी व कारवीने ठाकूरवाडी येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड व ठाणे येथील अधिकारी, कर्मचार्यांनी 11 व 12 सप्टेंबर रोजी केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टीची दारू आणि रसायन मिळून एकूण दोन लाख सहा हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धाडीदरम्यान एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच 80 लिटर हातभट्टी दारू आणि सात हजार 400 लिटर रसायनही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मुरूड विभाग निरीक्षक आनंद पवार यांनी दिली.