Breaking News

माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; ‘रास्ता रोको’ करण्याचा भाजपचा इशारा

माणगाव : प्रतिनिधी

येथील बसस्थानक परिसरात प्रचंड खड्डे पडले असून, त्याकडे राज्य परिवहन महामंडळ पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. माणगाव बसस्थानक लवकरात लवकर खड्डेमुक्त केले नाही, तर बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र येथील एसटी बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्याकडे परिवहन महामंडळ पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे. या बसस्थानकातील खड्ड्यांचा प्रश्न गेली अनेक  वर्षे सर्वांनाच सतावत आहे. या खड्ड्यांवर महामंडळाने तीन वर्षापूर्वी तात्पुरती मलमपट्टी केली होती, पण हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत नाही. माणगाव बसस्थानकात मुंबई, तसेच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून दररोज अनेक बसेस येत असतात. त्यांना माणगाव स्थानकात प्रवेश करताना या खड्ड्यांना तोंड द्यावे लागत आहे. या खड्ड्यांच्या समस्येबाबत आता  माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, माणगावच्या बसस्थानकातील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालक व प्रवाशांना सतावत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने प्रवासी, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या बसस्थानकाचा संपूर्ण परिसर महामंडळाने खड्डेमुक्त करावा अन्यथा माणगाव तालुका भाजपतर्फे 1 नोव्हेंबर 2021 रोजी स्थानकांसमोर बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply