Breaking News

शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 16) पहिले शिबिर खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे झाले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेव पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते विनोद घरत, दिनेश खानावकर, गीता चौधरी, बिना गोगरी, तसेच मनीषा पाटील, संजय बिक्कड, डी. एल. पवार, प्रकाश लोंढे, निर्दोष केणी, स्मिता गोडबोले, प्रसिका शिंदे, मीनाक्षी घाटे, जान्हवी मानकामे आदी तहसील कार्यालय अधिकार्‍यांची उपस्थिती लाभली.  

 रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमिसाईल, आधारकार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना तहसील कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात. त्यामुळे वेळ आणि आर्थिक भूर्दंड पडत असतो. जनतेचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
यातील पहिले शिबिर गुरुवारी खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे झाले. यानंतर 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल येथे, 24 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता कळंबोलीतील नवीन सुधागड हायस्कूल येथे, 1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता आजिवली हायस्कूल येथे, 8 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात, तर 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गव्हाण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिबिर होणार आहे. या शिबिरात रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply