दुबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रविवारी (दि. 19) रंगणार आहे. या टीम्सचा या आयपीएलमधील हा 30वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्व चाहत्यांना स्टार स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा या सत्रातील दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर चार विकेट्स राखून दमदार विजय मिळवला होता. मुंबई संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झालेला आहे, पण दुसरीकडे चेन्नईच्या संघाला काही बदल करावे लागणार आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …