Breaking News

खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था

येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी 36व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करीत पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी कुमारांनी 31 विजेतेपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी ओडिशाचा 15-14 असा धुव्वा उडवला. मुलींनी 36 (मुलीच्या स्पर्धा चार वर्ष उशिरा सुरू झाल्या)पैकी 32व्यांदा अंतिम फेरीत पोहचल्या असून त्यांनी 22 अजिंक्यपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी यजमान ओडिशावर अलाहिदा डावात 16-16 बरोबरी नंतर आठ सेकंदाच्या फरकाने उपांत्य फेरीत पराभव केला. कुमारांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान ओडिशा संघावर तब्बल साडेचार मिनिटे राखून 15-14 (मध्यंतर 11-05) असा एका गुणाने धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे (2.30, 1 मिनिटे संरक्षण व एक गडी), सिराज भावे (2.20, 1.30 मिनिटे संरक्षण), किरण वासावे (1.40, 2 मिनिटे संरक्षण व दोन गडी), सौरभ अहिर (1.20, 1 मिनिटे संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळी करताना यजमानांना पराभवाची धूळ चारली.  मुलांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीने पश्चिम बंगालचा 12-11 (मध्यंतर 7-6) असा एका गुणाने निसटता पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान ओडिशावर जादा डावात 16-16 (6-6, 5-5 व 5-5) अशी बरोबरी झाल्यावर अलाहिदा डावात व चुरशीच्या सामन्यात आठ सेकंदाच्या फरकाने विजयश्री खेचून आणली. या सामन्यात महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे (2, 3, 1.40 मिनिटे संरक्षण), अंकिता लोहार (2.10, 2.30, 1.30 मिनिटे संरक्षण व एक बळी), संपदा मोरे (1.20, 2 मिनिटे संरक्षण व चार बळी), कौशल्या पवार (2.20, 1.30 मिनिटे संरक्षण व तीन बळी) यांच्या झुंजार खेळीमुळे महाराष्ट्र विजयी होऊ शकला. मुलींच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूरने कर्नाटकचा 9-8 (मध्यंतर 9-4) असा एक डाव व एका गुणाने पराभव केला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply