Breaking News

ग्रामस्थांचा विरोध डावलून एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही!

आमदार प्रशांत ठाकूर यांची स्पष्ट भूमिका

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील कोळेवाडी व पाले बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांचा विरोध डावलून तेथे एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जमीन संपादनाबाबत चर्चा करण्यासाठी पनवेलच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मांडली.
कोळेवाडी व पाले बुद्रुक परिसरातील 180 एकर जमीन एअर फोर्स प्रकल्पासाठी संपादन कार्यवाही करण्याबाबत पनवेलच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी बोलाविलेल्या  बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे आर.सी. घरत, शिवसेना सल्लागार बबन पाटील, पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे आमोद ठक्कर, संरक्षण खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सर्वांनी या भूसंपादनाला विरोध दर्शविला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, या प्रकल्पाला 180 एकर जागा लागणार असून त्यामुळे 900 चौरस मीटर परिसरातील ग्रामस्थांच्या बांधकामांवर बंधन येणार आहेत. तीन मीटरपेक्षा उंच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ते पाहता देशासाठी हा प्रकल्प महत्वाचा असला तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध डावलून प्रकल्प होऊ नयेे.
उरण तालुक्यातील मोरा येथे नॅशनल अमिनेशन डेपो (एनएडी)मुळे तेथील स्थानिकांच्या बांधकामावर बंधने आली. आज त्यांच्या पूर्वी केलेल्या बांधकामांवरही कायम टांगती तलवार आहे. अशा समस्यांना तोंड द्यावे लागू नये. त्याची पुनरावृत्ती येथे घडू नये यासाठी मी तुमच्यासोबत असल्याची ग्वाहीदेखील या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply