Breaking News

पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचार्‍यांचा कोरोना योद्धा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या स्वच्छतादूतांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान होत आहे. त्यानुसार महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, सहाय्यक आयुक्त वैभव विधाते, विभाग प्रमुख अनिल कोकरे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, शहर समन्वयक सदाखत अली अन्सारी, स्वच्छता निरीक्षक अभिजित भवर आदी उपस्थित होते. या वेळी कोरोना योद्ध्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply