Breaking News

पनवेलमध्ये शनिवारी ‘दिलखुलास गप्पा’; संवादमालेत शरद पोंक्षे गुंफणार तिसरे पुष्प

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीने संवादमाला पुष्प 3 अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते तथा लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पा कार्यक्रमाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात येत्या शनिवारी (दि. 23) सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार असून एबीपी माझा वृत्तवाहिनीचे निवेदक दीपक पळसुळे त्यांची मुलाखत घेणार आहेत. या वेळी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून होणार्‍या या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिका अनिवार्य व मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन (9029580343) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply