Breaking News

नेरळमध्ये मिशन युवा स्वास्थ्य

टिपणीस महाविद्यालयातील 95 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण

कर्जत : बातमीदार

विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडून  मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात आले. या मोहीमेत महाविद्यालयातील 18 वर्षावरील 95 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

मातोश्री टिपणीस महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन विद्या मंदिर मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. जी. लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सागर काटे, डॉ. पवार, नेरळ उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्रा. सागर मोहिते, प्रा. अमोल सोनवणे, प्रा. संतोष तुकमाने, प्रा. सोनम गुप्ता, डॉ. स्नेहल देशमुख, अनंत घरत, वैभव बोराडे, विकास घारे, जागृती घारे, दुराज टिवाळे, नेरळ विद्या मंदिराचे प्राचार्य प्रमोद विचवे आदी उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत एकूण 60 विद्यार्थ्यांचे लसीकरणकरण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply