Breaking News

आरिवलीत विविध सामाजिक उपक्रम; भाजप नेते अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे पनवेल तालुका चिटणीस तथा कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र गोजे यांच्या वाढदिवसानिमीत्त आरिवली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव अशा विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महेंद्र गोजे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील आरिवली येथील शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्सफूर्द प्रतिसाद लाभला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावीमध्ये राज पाटील, प्राप्ती पाटील, वरद लबडे, आणि बारावीमध्ये चिन्मय भगत मानसी पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या वेळी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते आप्पा भागीत, माजी सरपंच राम गोजे, पुंडलीक पाटील, वासुदेव गोजे, महादू गोजे, गोपाळ राऊत, हरिभाऊ पाटील, अनंता पाटील, खंडू गोजे, सिताराम गोजे, मारुती गोजे, काशिनाथ दाभणे, सुरेश गोजे, राम राऊत, प्रवीण गोजे, पुंडलिक गोजे नरेश राऊत, बळवंत पाटील, गोविंद्र पाटील, मारुती पाटील, काशिनाथ पाटील, राजू पाटील, अरुण पाटील, तानाजी पाटील यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी महेंद्र गोजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply