Breaking News

आरपीएलचे आज उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड प्रीमियर लीग क्रिकेट समिती आयोजित 25 वर्षाखालील मुलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी-मोहोपाडा येथील एनआयएसएमच्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 14) अलिबागच्या कुरूळ येथील क्षेत्रिय समाज हॉलमध्ये रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या उद्घाटन समारंभास लोकप्रतिनिधी, क्रीडा पदाधिकारी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील क्रिकेटशी संबंधित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत जिल्ह्यातील आठ संघ सहभागी झाले आहेत. साखळी स्वरूपात खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेची उत्सुकता सर्व खेळाडूंना व क्रिकेटरसिकांना लागून राहिली आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply