Breaking News

पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होणार

  • शासनाचे संकेत

मुंबई ः प्रतिनिधी
येत्या 10-15 दिवसांत राज्यातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर हा निर्णय होईल.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरांत आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरू झाले आहेत. आता पहिलीपासूनचेही वर्ग सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, शाळाचालक, पालकही आग्रही दिसत आहेत. कोरोना रुग्णांचा आलेख घटू लागल्याने शाळा सुरू करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढतोय. 60 टक्के विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविरोधात लढणार्‍या अँटिबॉडिज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात, असा सल्ला काही डॉक्टरांनी दिला आहे.
सध्या मुख्यमंत्री मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाळांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे कळते.
पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे

सारे काही पूर्ववत झाले आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्यात कोणताही धोका नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आपण सामना केला आहे. त्याला आपण चांगल्या पद्धतीने ओळखलेय. काय करायला हवे हेही चांगले माहीत झाले आहे. यामध्ये लहान मुले सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत. यापैकी अनेक जणांना याधीच कोरोनाची लागण झाली अन् ते ठीकही झाले. काही मुलांमध्ये तर कोरोनाची लक्षणेही आढळली नाहीत. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवायला हवे, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply