उरण : रामप्रहर वृत्त
उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गव्हाण फाटा येथे उड्डाणपूल साकारण्यात आला आहे. उरण, पनवेल आणि उलवे या शहरांना जोडणार्या या पुलाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 19) लोकार्पण झाले. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
उरण मतदारसंघामध्ये आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विविध विकासाची कामे सुरू असून, या कामांना वेग आला आहे. त्यानुसार पनवेल-उरण या मार्गावरून प्रवास करत असताना गव्हाण फाटा येथे होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता गव्हाण फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. हा उड्डाणपूल उरण, पनवेल आणि उलवे या तीन शहरांना जोडणार असून यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. हा उड्डाणपूल सुरू व्हावा यासाठी पनवेल, उरण, उलवे येथील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी लक्षात घेऊन हा पूल उभारण्यात आला. शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, उद्योजक जे. एम. म्हात्रे, नारायण घरत, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, विठ्ठल ओवळेकर, मदन पाटील, भाजप युवा मोर्चाचे निलेश खारकर, राकेश गायकवाड, धिरज ओवळेकर, मच्छिंद्र कोळी, शैलेश भगत, प्रिया आडसुळ, आरती तिवारी, नंदकुमार ठाकूर, वितेश म्हात्रे, प्रणय कोळी, सचिन घरत, अमित घरत, विशाल म्हात्रे, निलेश खोत, प्रदीप खोत, कृष्णा सगादेवन, टीआयपीएलचे भरणीकुमार साहेब आदी उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना …