अलिबाग : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील काशीद येथे 26 ते 28 नोव्हेबर या कालावधीत महाराष्ट्र, गोवा व गुजारत या तीन राज्यांतील बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
भरतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या रायगड शाखेच्या यजमानपदाखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या या अधिवेशनात बालकांच्या समस्यांवर चार्चासत्र, परिसंवाद व व्याख्याने होणार आहे. शुक्रवारी 26 नोव्हेबर रोजी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण व शहरी भगातील वैद्यकीय सेवेतील तफावत कशी भरून काढता येईल, या विषयावर डॉ. महेश मोहिते आपले विचार मांडणार आहेत, तर आदिवासी मुलांच्या समस्या या विषयावर डॉ. पुखराज बाफना यांचे भाषण होईल. कोविड 19 या आजारावर एक परिसंवाद होणार आहे. या आजाराचे त्वरित व दूरगामी होणारे परिणाम, उपचारपद्धती व लसीकरण यावर विस्तृत चर्चा होणार आहे.
बालरोगतज्ज्ञ रायगड शाखेच्या अध्यक्ष डॉ. सुनीता इंगळे, डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. हेमंत गंगोलीया, डॉ. जय भांडारकर, डॉ. विनायक पाटील, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. प्रमोद वानखेडे, डॉ. सुनील शेठ, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ. निलिमा भांडारकर, तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञ या अधिवेशनाची तयारी करीत आहेत.