Breaking News

पाकिस्तानातून आलेले चिनी बनावटीचे ड्रोन बीएसएफने पाडले

नवी दिल्ली : भारतीय सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचे घुसखोरी करण्याचे प्रत्यन सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगासमोर उघडे करणारी एक घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी (दि. 18) फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन यशस्वीरित्या पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे असल्याचेही समोर आले आहे. भारतीय लष्कराला असा संशय आहे की हे ड्रोन हेरॉईन किंवा शस्त्रांची एखादी खेप भारतीय हद्दीत फेकून परत जात होते. दरम्यान, ड्रोन ताब्यात घेण्यात आल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. पहिल्यांदाच पंजाबामध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आल्याची घटना घडली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply