माथेरान : रामप्रहर
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि. 26) माथेरानमध्ये रॅली काढण्या आली होती. या लोकसभा निवडणूकीत खासदार बारणे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी समस्त माथेरानच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सर्वधर्मीय मतदार या रॅलीमध्ये सहभागी झाले होेते. त्यामुळे महायुतीच्या श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठविण्यासाठी माथेरान सज्ज झाले असल्याचा अनुभव या भव्य रॅलीमधून दिसून आला.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी नव्याने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, भाजपचे कोंकण प्रांत प्रज्ञा प्रकोष्ठ संयोजक नितिन कांदळगावकर, आरपीआयचे तालुका प्रमुख तथा कर्जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर, नेरळचे शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास मोरे, माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, शहर संघटक प्रविण सकपाळ, महिला आघाडी शहर संघटक संगीता जांभळे, भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड, भीम टायगरचे रायगड जिल्हा संघटक गणेश चिकणे, वर्षा चिकणे, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, प्रकाश सुतार, प्रदीप घावरे, प्रसिद्धी प्रमुख अमोल चौगुले, सिताराम शिंदे, स्वप्नील कळंबे, अकबर मुजावर, अतिष सावंत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.