पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळा इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून 5 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. 4) काढला. विद्यार्थ्यांचे लसीकरण मात्र सुरूच राहणार आहे
पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19चा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण करणे व कोरोनाबाधितांची संख्या वाढून आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी महापालिका हद्दीतील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळा 5 जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग कोविड नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत, तर पहिली ते नववी व अकरावीचे शिक्षण ऑफलाइन पद्धतीने नियमित सुरू असेल.
दरम्यान, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलवता येणार आहे. हे लसीकरण पूर्ण होईल याकडे शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी प्रतिक्रिया देताना कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून रुग्णसंख्या आटोक्यात येईपर्यंत तो लागू असेल, असे सांगितले.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार
संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper