मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही, मात्र निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनचाही प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 5) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, सार्वजनिक आरोग्य आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते. या वेळी लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध लागू करण्याचे ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होकार आल्यावर राज्यासाठी नवे आदेश लागू करणार आहोत, असे या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. हे निर्बंध सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper