Breaking News

युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रसायनीजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिकेत तांडेल या युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी गुळसुंदे येथील अनिकेत अनिल तांडेल (वय 26) हा कामानिमित्त पनवेलला जात होता. रसायनी फाटा पार केल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनिकेतला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अनिकेतच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मित्र परिवार, ग्रामस्थ, महिला मंडळांनी अनिकेतच्या उपचारासाठी थोड्याबहुत प्रमाणात आर्थिक मदत केली आहे, मात्र अनिकेतच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी मित्र परिवाराने मदतीचे आवाहन केले आहे. अनिकेतला मदत करण्यासाठी निकेश तांडेल (7066202757), स्वप्नील चौलकर (7028881768) किंवा प्रथमेश पाटील (9222222988) यांच्याशी संपर्क साधावा.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply