Breaking News

Monthly Archives: March 2021

नावडे येथील उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी; सुधारणा करण्यासाठी बैठक बोलविण्याचे निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील नावडे येथे होत असलेल्या उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 12) पाहणी केली. या वेळी त्यांनी येथील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलाविण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. नावडे येथील उड्डाणपुलामुळे नावडे गाव व नावडे फेज-2मधील …

Read More »

सचिन वाझेंची एकाच दिवसात दोनदा बदली

मुंबई ः प्रतिनिधी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात वादग्रस्त ठरलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे. वझे यांना क्राइम ब्रांचमधून सुरुवातीला नियंत्रण कक्षात पाठवले गेले होते. आता त्यांची रवानगी नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष-1मध्ये करण्यात आली आहे. मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर …

Read More »

एमपीएससी परीक्षा आता 21 मार्चला

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. याआधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात उद्रेक झाला होता. यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा …

Read More »

पनवेल महानगरपालिकेत जैवविविधता समितीची स्थापना

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती व जैवविविधतेची माहिती गोळा करून त्याचा उपयोग पर्यावरणाच्या रक्षणासाठी करण्यात येणार आहेच, शिवाय दुर्मिळ औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे हे निमंत्रित सदस्य असणार आहेत …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

अहमदाबाद ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाला शुक्रवारी (दि. 12) प्रारंभ केला. पंतप्रधान मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. यासह गुजरातमध्ये सहा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधानांनी साबरमती आश्रमपासून 386 किलोमीटर लांब दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांनी …

Read More »

वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी देवरत्ननगर चुनाभट्टी येथील देवरत्ननगर रहिवासी महासंघ आणि स्नेहा धार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हेल्पेज इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ बुधवारी (दि.10) देवरत्ननगर संकुलातील व्यायामशाळेत करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष विजय औंधे, मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष शरद डिचोलकर, …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात महिला दिनी ऑनलाइन व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात सोमवारी (दि. 8) महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरीता मुंबई क्राईम ब्रँच महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शितल …

Read More »

कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ व सुंदर गावासाठी सातत्याने काम करणार्‍या सरपंच माधुरी पाटील यांच्या प्रयत्नातून कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल झाली आहे. या वाहनाचे लोकार्पण सरपंच माधुरी पाटील यांच्या हस्ते झाले. 15 व्या वित्त आयोग निधीतून ही घंटागाडी उपलब्ध झाली असून या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यास उपसरपंच रंजना राम नाईक, …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने  पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली. संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास …

Read More »

पनवेल मनपामध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती

पनवेल : प्रतिनिधी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मुंबई-संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिका मुख्यालयात साजरी करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेविका हेमलता रवी गोवारी, नगरसेवक  गोपीनाथ भगत, उप-आयुक्त सचिन पवार उप-आयुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक …

Read More »