Breaking News

Monthly Archives: March 2021

कुस्तीपटू विनेश फोगटला सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले. विनेशने 2017च्या विश्वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक रविवारी जिंकले.जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावरील विनेशला 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला 4-0 …

Read More »

इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी

टीम इंडिया पुन्हा टाकणार फिरकीचे जाळे अहमदाबाद : वृत्तसंस्थाटीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या निर्धाराने टीम इंडिया चौथ्या कसोटीत मैदानावर उतरणार आहे.डे नाइट कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या …

Read More »

रायगड जिल्हा भाजप चित्रपट कामगार सेलची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त चित्रपट, मालिका व नाट्यक्षेत्रात काम करणार्‍या कलाकार व तंत्रज्ञ यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचबरोबर होतकरू कलाकारांना वाव देण्याच्या दृष्टीने भाजप चित्रपट कामगार सेल रायगड जिल्हा कार्यकारिणीची स्थापना रविवारी (दि. 28) पनवेल येथे भाजप चित्रपट कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय रणदिवे व महाराष्ट्र प्रदेश चिटणीस वैभव जोशी …

Read More »

महिला सुरक्षेच्या प्रश्नाला रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून महिला सुरक्षेच्या प्रश्नासाठी रेल्वे पोलिसांना पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी घडलेला एक दुर्दैवी प्रकारामुळे रेल्वेने प्रवास करणार्‍या नवी मुंबईतील असंख्य महिला किती सुरक्षित आहेत, असा सवाल …

Read More »

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई 2021

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मिस नवी मुंबईच्या 10व्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी (दि. 27) वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्‍या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीकडून अपंग लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी भागातील कराडे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधी अंतर्गत पाच टक्के निधी वाटप करण्यात आले. या वेळी कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 21 लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी (उदा. तीनचाकी सायकल, कुबड्या, कानयंत्र आदी) प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश अपंग लाभार्थ्यांना देण्यात …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मयमंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात …

Read More »

कोरोना काळात डोळ्यांच्या समस्यांत वाढ

उपचारांना विलंब; आजार बळावले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे गेल्या काही महिन्यात मोतीबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाली आहे, असे …

Read More »

पनवेलमध्ये लवकरच कोरोना लस

सरकारी रुग्णालयात मोफत; खाजगी रुग्णालयात 250 रुपयांत लस खारघर : प्रतिनिधी पनवेलमध्ये कोरोना लस आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध होणार आहे. ही लस सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात नागरिकांना घेता येणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण पहिला व दुसरा टप्पा झाल्यानंतर आता शासनाच्या आदेशानुसार सर्वसामान्यांनादेखील ही लस घेता येणार आहे. याकरिता …

Read More »