Breaking News

संपादकीय

ईशान्येत भाजपचा डंका

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, विरोधक ‘मर जा मोदी-मर जा मोदी’ म्हणत आहेत, पण जनता ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. भाजपने त्रिपुरात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवित विजय साकारला, तर नागालँडमध्येही …

Read More »

बळीराजाला दिलासा

विधिमंडळात मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकर्‍यांची बाजू आक्रमकपणे मांडली असता त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधानकारक उत्तरे दिली. बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव सुरू झाले असून नाफेडतर्फेदेखील खरेदी सुरू झाली आहे तसेच राज्य सरकारतर्फेसुद्धा कांदा स्वतंत्ररित्या उचलला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. उन्हाळ्याचे वेध लागले की महाराष्ट्राच्या …

Read More »

बदलते हवामान व परिणाम

गेल्या काही दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल जाणवू लागला आहे. एकीकडे सकाळी व रात्री वातावरणात गारवा असताना दुसरीकडे दिवसा मात्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वातावरणात अचानक होणार्‍या या बदलाचे परिणाम शेतीवर तर होतच असतात, शिवाय मानवी आरोग्याच्या तक्रारीदेखील सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे वरचेवर वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षी जोरदार पाऊस पडला. …

Read More »

विद्यार्थ्यांचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या परीक्षांचा नवा पॅटर्न लागू करण्याचा हट्ट अखेर आयोगाने सोडून दिला आहे. राज्य सेवा परीक्षा यंदापासून नव्या पॅटर्ननुसार घेण्यात येणार होत्या. विद्यार्थ्यांचा त्याला कडाडून विरोध होता. परिणामी, या परीक्षा अखेर दोन वर्षे उशीराने नव्या पॅटर्ननुसार घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्य …

Read More »

सजग सहभाग हवा

अंटार्क्टिकातील हिमाच्छादित आवरण झपाट्याने कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या नोंदीतून यंदा गेल्या वर्षीपेक्षा काहिसे लवकरच ध्यानात आले असून यापूर्वी कधीही तिथे इतकी टोकाची परिस्थिती आढळलेली नाही असे निरीक्षण ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. तेथील हिम वितळण्याचा मौसम संपण्यास काही आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना विक्रमी बदल नोंदला गेल्याने जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांचा विळखा पृथ्वीला …

Read More »

क्रिकेटनभीच्या तारका!

भारतीय समाज जगभरातला आघाडीचा क्रिकेटप्रेमी असला तरी आपण सार्‍यांनी नेहमीच महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले. म्हणायला गेली कित्येक वर्षे महिलांसाठीच्या कसोटी स्पर्धा, एकदिवसीय सामने आदी पार पडत आले. पण महिला क्रिकेटपटूंनी किती खडतर परिस्थितीत आपला खेळ सुरू ठेवला हे त्याच जाणतात. अलीकडच्या काळात महिलांसाठीच्या वीस षटकांच्या लढतीही सुरू झाल्या, पण …

Read More »

लोकशाहीचा पहारेकरी

मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या उत्तराखंडच्या मायभूमीत परत जातील आणि त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे झुंजार नेते आणि झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतील. झारखंडमध्ये माननीय रमेश बैस यांनी आपल्या घटनात्मक प्रमुखपदाचा इंगा तेथील सरकारातील काही महाभागांना दाखवला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात ते राज्यपाल …

Read More »

उथळ प्रश्न, सखोल उत्तरे

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबतच्या आभारप्रदर्शन ठरावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर बेफाम आरोप केले. त्या आरोपांना ना शेंडा होता, ना बुडखा. खरे तर, मोदी यांना अशाप्रकारे प्रश्न विचारणे हे कुठल्याही काँग्रेस खासदारासाठी हास्यास्पदच ठरते. राहुल गांधी हे स्वत: गैरव्यवहारांच्या आरोपांखाली जामिनावर आहेत. अशा लोकांना मोदींसारख्या स्वच्छ …

Read More »

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस उलटले तरी त्याचे कवित्व चालूच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळी आणि बेमुर्वतखोरी यांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेच आता काँग्रेस नेत्यांचे पितळ …

Read More »

पायपीट संपली

‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा संदेश वस्तुत: राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांवर बिंबवण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाबद्दलच आक्षेप घेतले गेले होते. जोडण्यासाठी भारत तुटला तरी कुठे आहे असा सवाल केला जात होता, जो रास्त आहे. जे मोडलेलेच नाही, ते जोडणार कसे? भारतीय समाज विविधतेने …

Read More »