Breaking News

बॅडमिंटन स्पर्धेत अलिबागचे सुजल गट्टे-युग सोनी विजेते

म्हसळा ः प्रतिनिधी

म्हसळा बॅडमिंटनक्लबच्या यजमानपदाखाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील महाड, रोहा, आलिबाग व अन्य तालुक्यांतून 32 संघ सहभागी झाले होते. म्हसळा येथील युसुफ अष्टीकर आणि अझेन कादिरी यांनी द्वितीय, तर रोहा येथील निहार आणि मुसीफ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच आकर्षक चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इम्रान कादरी, मोहित मेहता, यतीन करडे, सलमान पठाण, साद काझी, अबीद, झोहेब तसेच ज्योती ढापले व टिप टॉप ग्रुप श्रीवर्धन यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply