फटाके वाजवून व पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव
पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या निवडणुकीत पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले. त्याचा जल्लोष पनवेलमधी विविध भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला.
खारघर-तळोजा मंडळच्या वतीने भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी भाजप मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अभिमन्यू पाटील, नगरसेवक अनिता पाटील, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका, प्रवीण पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सहसंयोजिका सोशल मीडिया मोना आडवाणी, सरचिटणीस महिला मोर्चा साधना पवार, अमर उपाध्याय, किरण पाटील, अॅड. राजेंद्र अग्रवाल, संयोजक उत्तर भारतीय मोर्चा विनोद ठाकूर, शैलेंद्र त्रिपाठी, संदीप रेड्डी, नवनीत मारु, कुणाल सांगानी, रमेश महेंद्रू, मुकेश अग्रवाल, योगिंद्रम कोट्टरी, श्यामला शेट्टीगर, वैशाली प्रजापती, लखवीरसिंग सैनी उपस्थित होते.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले व त्यातील 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय आणि मध्यवर्ती भाजपा कार्यालय, सेक्टर 36 येथे सायंकाळी 7.30 वाजता एकत्र येऊन फटाके फोडून आणि मिठाई वाटण्यात आली. कामोठे मंडळ रवींद्र जोशी, नगरसेवक विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, नगरसेविका संतोषी तुपे, नगरसेविका शिला भगत, युवा नेते हेप्पि सिंग, कामोठे युवा मोर्चाध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, भाऊ भगत, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष विनोद खेडकर, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, प्रवीण कोरडे, आशिष पटेल, उत्तम जाधव, सुरेंद्र हल्लिकर, मनीषा वणवे, वनिता पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी मुंबईतील शिवाजी चौक वाशी येथे भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. देशातील पाचपैकी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादित केले असून ही विकासाची पावती असल्याचे मनोगत भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले. राज्यातही आगामी काळात भाजपची लाट असणार असून त्याची सुरुवात नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकून होईल, अशी ग्वाही डॉ. घरत यांनी दिली. या वेळी नवी मुंबई प्रभारी सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, महामंत्री कृष्णा पाटील, नवी मुंबई भाजप युवती अध्यक्षा दुर्गा डोख, युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू, विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, डॉ. जे. के. नाथ, रविंद्र इथापे, युवा अध्यक्ष दत्ता घंगाळे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून, ढोल-ताशावर नाचून आपला आनंदोत्सव साजरा केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper