रसायनी : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरद अंगण सोसायटीकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तेथील पथदिवे नादुरुस्त असून काही ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागातील कामासाठी बाहेर जाणार्या नागरिकांची, तसेच वाहनचालकांची गैरसोय होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्या वरद अंगण रस्त्यावर ग्रामपंचायतीकडून पथदिवे लावण्यात आले होते, पण बहुतेक पथदिवे निकामी झाले आहेत. या भागात शेकडो लोकांची वस्ती आहे. मागील काही महिन्यांपासून येथील रस्त्यावर बहुतेक पथदिवे बंद आहेत, त्यामुळेच रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनदेखील ते कानाडोळा करीत आहेत, पथदिवे लावण्यासाठी इलेक्ट्रिशन उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. पथदिवे बंद असल्याने कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी वर्ग, वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Check Also
साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी
असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …
RamPrahar – The Panvel Daily Paper