महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील वेटलिफ्टर प्रशांत चायाजी जाधव याची कोलकाता येथे होणार्या पॅराऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संघात प्रशांतचा समावेश करण्यात आला आहे. प्रशांत जाधव या दिव्यांग तरुणाने आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात नाव उंचावले आहे. गेल्या अनेक वर्षांत मुंबईसह विविध ठिकाणच्या स्पर्धांमधून प्रशांतने यश संपादन केले आहे. प्रशांतच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची दखल घेत कोलकाता येथे होणार्या पॅराऑलिम्पिकसाठी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल प्रशांतचे अभिनंदन होत असून अनेकांनी त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.