Breaking News

नागेवाडीयेथील दिव्यांगाला मदतीचा हात

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पाथरज नागेवाडी येथील जना चांगो कांबडी (वय 47) या अदिवासी बांधवांला 2014 साली विजेचा शॉक लागून अपघात झाला होता. त्यात   त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. कामोठे (पनवेल) येथील एकता सामजिक संस्थेने जना चांगो कांबडी यांना व्हीलचेअर, पलंग तसेच दिव्यांगाला आवश्यक असणारे साहित्य दिल्याने जना कांबडी यांचे जीवन काहीसं सुसह्य होणार आहे. जना कांबडी यांना विजेचा शॉक लागून अपघात झाला होता. मागील सात आठ वर्षे हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही त्यांना अपंगत्वावर मात करता आली नाही, मणक्याला आघात झाल्याने त्यांचे शरीर  कमरेच्या खाली पुर्णतः लुळे पडले आहेत. ते अंथरुणाला खिळून आहेत. ही व्यथा सोशल मिडियावर मांडून त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून मदतीचे हात पुढे आले आहेत. कळंब पोलीस दुरक्षेत्रचे निरीक्षक सुनील शेमडे यांनी जना कांबडी यांना चांगल्या दर्जाची मट्रेस तसेच उशी, पांघरूणची सोय करून दिली.  सामजिक कार्यकर्ते हरिचंद्र आढारी यांच्या माध्यमातून कामोठे येथील एकता सामजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, दशरथ माने, हरीश बाबरिया, अल्पेश माने, दर्शन म्हात्रे, भागूचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी, जेड फाउंडेशनचे यश सप्रे यांनी जना कांबडी यांच्या नागेवाडी येथील घरी जाऊन त्यांना व्हीलचेअर, पलंग तसेच दिव्यांगाला आवश्यक असणारे साहित्य दिले. या मदतीने भारावलेल्या जना कांबडी यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply