Breaking News

जखमी असूनही सतीश कुमार लढला; भारतीय बॉक्सरच्या झुंझारपणाचे कौतुक

टोकियो ः वृत्तसंस्था

भारताचा 91 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला हरविले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेर्‍यांत जलोलोव प्रभावी ठरला. उझबेकिस्तानच्या बॉक्सरने सतीशचा 5-0 असा पराभव करून आपले पदक निश्चित केले. तत्पूर्वी त्याने आपला उप-उपांत्यपूर्व सामना अझरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेवविरुद्ध एकतर्फी जिंकला होता, तर सतीश कुमार मागच्या सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे जलोलोवविरुद्ध त्याचे रिंगवर खेळणेदेखील निश्चित नव्हते. जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनविरुद्धच्या सामन्यात सतीशच्या हनुवटीवर आणि उजव्या डोळ्याला मार बसला होता. यानंतर त्याला सात टाके पडले. सतीशने हा सामना 4-1 असा जिंकला होता. टाके लागल्यानंतरही तो आज मैदानावर उतरला. त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या बॉक्सरविरुद्ध शरणागती पत्करली नाही. तो लढत राहिला. या सामन्यात त्याला मार बसलेल्या ठिकाणी ठोसा बसला. तेव्हा त्या भागातू रक्त वाहू लागले. तरीही तो लढला, पण त्याला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply