Breaking News

भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका किल्लेकर

मुरूड : प्रतिनिधी

भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका परेश किल्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाविका किल्लेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाविका किल्लेकर या अगोदर मुरूड शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. शहर व ग्रामीण भागात भाजप अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुरूड तालुका भाजप युवती मोर्चाच्या नवनियुक्त अध्यक्षा भाविका किल्लेकर यांनी सांगितले.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply