पनवेल ः केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे, माजी सरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, विलास ठाकूर, महादेव म्हात्रे, राजेश घरत, संजय कोळी, मिलिंद कोळी, महेंद्र भोईर, प्रदीप भोईर, गणेश शेलार, रोशन भोईर, ग्रामपंचायत सदस्य वंदना वाघे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्कृष्ट पर्याय असलेल्या  भारतीय जनता पक्षात शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. त्यांनी रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply