Breaking News

महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गर्भवती

महाड ः प्रतिनिधी

एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने यातून ही मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील कोतूर्डे आदिवासीवाडीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोतूर्डे आदिवासीवाडीतील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मागील दोन वर्षांपासून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले होते. यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आहे. पोलिसांकडून अल्पवयीन मुलावर बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply