पनवेल : रामप्रहर वृत्त
पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलची बॉक्सर दुर्पता सौद आणि सिद्धेश पावशे यांनी सुवर्णपदक जिंकले. या सब ज्युनियर मुले व मुलींच्या स्पर्धेत रायगडचे दोन सुवर्णपदके पटकावली.
पनवेलच्या दुर्पता सौद ऊर्फ छोटीने मुलींच्या 38 किलो वजनी गटात सातारा, जळगाव येथील बॉक्सर्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत पुण्याच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. तिला मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर म्हणूनही गौरविण्यात आले. दुर्पता ही पनवेलमधील दगडी शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकते आणि प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांच्याकडे आणि माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
मुलांमध्ये सिद्धेश पावसे याने 61 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मुंबई, क्रीडापीठ अकोला आणि औरंगाबाद येथील बॉक्सर्सचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. आदई येथील रहिवासी सिद्धेश पावसे हा सिद्धार्थ वर्मा आणि अद्वैत शेंबवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
या दोन्ही बॉक्सरची 20 ते 25 मेदरम्यान कर्नाटकमधील बेल्लारी येथे होणार्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
Check Also
‘रयत’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper