Breaking News

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नवी मुंबईत ग्रामस्वच्छता अभियान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय तिर्थरूप डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 76व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तिर्थरूप डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून नवी मुंबई महानगरामध्ये प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या मदतीने ग्रामस्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते.

या ग्रामस्वच्छता अभियानात सुमारे 3125 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला तसेच विभागवार रचनेच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण महानगरामध्ये स्वच्छता करण्यास सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी आणि स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले तसेच डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभारसुद्धा मानले.

ग्रामस्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला व प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्ष सातत्याने समाजसेवेचे कार्य सुरू आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply