उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
जेएनपीएने बंदरात बांधलेल्या डीएफसी कंप्लायंट रेल यार्ड आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी त्यांनी जेएनपीएच्या पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन करताना बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
33व्या वर्षात पदार्पण करणार्या जेएनपीएच्या यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन करतानाच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी केंद्र सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, सागरमाला, एमआयव्ही 2030 आदी विविध उपक्रमांमध्ये जेएनपीएने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मागील तीन दशकांतील जेएनपीएच्या विविध विकासकामे आणि योगदानामुळेच या बंदराने जागतिक स्तरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले, तर जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराच्या मागील 32 वर्षांतील प्रगतीचा आलेख मांडला. या वेळी उपाध्यक्ष उन्मेष वाघ व इतर उपस्थित होते.
दरम्यान, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनवाल यांचे आगमन होताच त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, शहराध्यक्ष कौशिक शाह आणि सहकारी सोबत होते.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper