Breaking News

ओबीसी आरक्षणासाठी आज पनवेलमध्ये भाजपचे उपोषण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. याच्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे सोमवारी (दि. 23) पनवेल प्रांत कार्यालयाशेजारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित केले त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखालीे पनवेल प्रांत कार्यालयाशेजारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या उपोषणात पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसी बंधू-भगिनींनी सहभागी होऊन सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडूया, असे आवाहन ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर आणि महिला जिल्हाध्यक्ष व उपमहापौर सीताताई पाटील यांनी केले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply