Breaking News

सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद

पावसाळी वातावरणामुळे पुरातत्त्व विभागाचा निर्णय

मुरूड ः प्रतिनिधी

पावसाळा जवळ आल्याने समुद्रात उसळणार्‍या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मुरूडजवळील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला गुरुवार (दि. 26)पासून पर्यटकांना बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याने तशी घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथून बोटीने जावे लागते. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण वाढले आहे. या लाटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीही धडकत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळी हंगाम संपेपर्यंत किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची  माहिती पुरातत्त्व खात्याचे अधिकारी बजरंग ऐलीकर यांनी दिली.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply