Breaking News

भाजपच्या सुशासन, गरीब कल्याण सेवा पर्वास खोपोलीत प्रारंभ

खोपोली : प्रतिनिधी

केंद्र शासनातील मोदी सरकारचा कालावधी आठ वर्षाचा संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी या कल्याणकारी योजना मंजूर केल्या. त्या सर्व योजना जनतेपर्यंत त्याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक ते 14 जून या कालावधीत सुशासन व गरीब कल्याण सेवा पर्व या कार्यक्रमांतर्गत विविध स्तरातील घटकांच्या नागरिकापर्यंत संपर्क साधून केंद्र शासनाच्या ज्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, त्याची माहिती देण्याचा संकल्प खोपोली भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपच्या रायगड जिल्हा उत्तर महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्तरातील प्रमुख महिला कार्यकर्त्यांची बैठक अश्विनी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अश्विनी पाटील यांनी केंद्र शासनाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देताना, या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. याचवेळी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, महिला शहर सरचिटणीस अश्विनी अत्रे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी काही उपस्थित महिला कार्यकर्त्यांनीही या महत्त्वपूर्ण चर्चासत्रात भाग घेतला होता. यावेळी शहराच्या विविध भागातील विविध स्तरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान प्रारंभी उपस्थित महिलांचे स्वागत अश्विनी पाटील व अश्विनी अत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. आभार प्रवेशानंतर बैठक समाप्त झाली.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply