केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबिर

नवी मुंबई : बातमीदार

रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर (सीएटीसी) व थल सैनिक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

हे शिबिर 5 ते 14 जून 2022दरम्यान झाले असून यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 414 प्रशिक्षणार्थी मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध एन.सी.सी. बटालियनचे 30 सैनिक स्टाफ सहभागी झाले होते. कोरोना काळात एन.सी.सी. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली होती. कोरोना संकटानंतर प्रथमच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी येथे प्रशिक्षण शिबीर ठेण्यात आले होते. शासनाचे कोरोनाविश्यीचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून शिबिर आयोजित करण्यात आला होता.

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वविकास, श्स्त्रप्रशिक्षण, अडथळे, नकाशावाचन, आयोग्य स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, मैदानी आणि युद्धकलेचे सखोल सैद्धांतिक आणि व्यवहारिक ज्ञान देण्यात आले.  कॅम्प कमाडंट, कर्नल तुषार जोशी, (सेनामेडल), यांनी छात्रांना संबोधितकरताना म्हणाले की राष्ट्रउभारणीत एन.सी.सी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एन.सी.सी मध्ये सहभागी होण्यास आवाहन केले. त्यांनी शिबिराच्या संपूर्णकालावधीत एन.डी.ए-एन.ए., सी.दि.एस.ई आणि एस.एस.बी. इच्छुकविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लेफ्टनंट कर्नल सुनील झुत्शी, रवी सामल आणि त्यांच्या सहाय्यक एनसीसी अधिकारी, जेसीओ, स्थायी प्रशिक्षक कर्मचारी, यांच्याशस्त्रास्त्रे, आपत्तीव्यवस्थापन, शारीरिकसक्षमता, सामाजिक, सामुदायिक व सांस्कृतिक विकासाचे प्रशिक्षण देत अविरत देश सेवेचा निर्धार व्यक्त केला.

मूलभूत प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त, एन.सी.सी कॅडेट्सचीपुढीलशिबिरांमध्ये एन.सी.सी मुंबईगट‘अ’ आणि महाराष्ट्रदलाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रजासत्ताक दिनशिबिर2023मध्ये निवड केली जाईल. करोना विरोधी लढ्यात ’एनसीसी’च्या छात्रांनी नागरी प्रशासन, पोलिस आणि संरक्षण कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला आहे. छात्रांनी हेल्पलाइन किंवा कॉलसेंटरचे व्यवस्थापन, मदतपुरवठा, औषधे, अन्न, आवश्यक वस्तूंचे वितरण, समुदाय सहकार्य, डेटाव्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभेराहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन आदी कामे केली आहेत. निस्वार्थी सेवाभावाची भावना तरुण छात्रांमध्ये जागृत करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे आयोजन प्रा. डॉ. शुभदा नायक व त्यांची टीम, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुखयांच्या सहकार्यामुळे शक्य झाले.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply