Breaking News

पनवेलमध्ये गुरुवारी ‘भेटला विठ्ठल माझा’; सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल

पनवेल : रामप्रहर वृत्त
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने गुरुवारी (दि. 14) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलमध्ये ’भेटला विठ्ठल माझा’ सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्‍या या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते सागर म्हात्रे यांचा विशेष सत्कार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील निवडक गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या मैफिलत गायक मेघना भावे, नचिकेत देसाई, प्रणय पवार, वादक विवेक भागवत, मनीष डुंबरे, प्रणव हरिदास, समीर कर्वे, विशाल माळी, झंकार कानडे, तर निवेदक म्हणून स्नेहल दामले यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिकेसाठी निखिल गोरे (8097248877) किंवा कौस्तुभ सोमण (9619441367) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply