पाली : प्रतिनिधी
भुवनेश्वर येथे होणार्या राष्ट्रीय जलतरण वॉटर पोलो स्पर्धेकरीता रायगड जिल्ह्यातील सात खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. हे खेळाडू रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे येथील हेल्थ क्लब जलतरण तलावाचे जलतरणपटू आहेत.
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी राष्ट्रीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा 16 ते 20 जुलैदरम्यान ओडिशातील भुवनेश्वर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रेषित तरे, सार्थक इंद्र, सुजल भोय, प्रेम पाटील, रोहित कुथे, दिनांशु कुथे, आदर्श म्हात्रे यांची निवड झाली आहे. या खेळाडूंनी उरी जिद्द बाळगत कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सरावातून राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. या सर्वांचे अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे, गितेश कुथे, रोशन कुथे, प्रेमराज पिंगळे यांनी मार्गदर्शन केले, तर रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष शशांक गोयल, विनायक किलोस्कर, उदय दिवेकर, इस्टेटचे मॅनेजर अजिंक्य पाटील, सतीश पाटील, अशोक विधाते, रायगड जिल्हा जलतलरण संघटनेचे अध्यक्ष राजू कोळी आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper