नागोठणे : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालक जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी झाला. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. रोहिदास घासे आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असतानाच ही घटना घडली. परीसरात रात्रभर पाऊस सुरू होता. सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिला. पावसासह वादळीवाराही सुरू असल्याने त्यातच घासे यांचे घर कोसळले. घराच्या छताचा भाग रिद्धी घासे (9) व रियांश घासे (3) यांच्यावर पडल्याने त्यात ते जखमी झाले. रियांश हा गंभीर जखमी झाला आहे. शेजार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारासाठी एमजीएम पनवेल येथे हलविण्यात आले आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper