Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबागेत कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग येथील अधिकारी जिमखाना येथे महिला व पुरुष अधिकारी-कर्मचार्‍यांची कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी (दि. 12) झाली.
जिल्ह्यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅरम स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी तहसीलदार (पुनर्वसन) डॉ. सतीश कदम यांनी, तर बॅडमिंटन स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी तहसीलदार (महसूल) सचिन शेजाळ यांनी पाहिली.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, तहसीलदार (पुनर्वसन) डॉ. सतीश कदम, रिलायन्स इंडस्ट्रीज, नागोठणेचे महाव्यवस्थापक आनंद देशपांडे, उपमहाव्यवस्थापक रमेश धनावडे यांची उपस्थिती होती.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply